विशेष
मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी ! ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यासह आज अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.
अहमदनगर जिल्हा ओळखला जातो तो सहकारी साखर कारखान्यांचा मूलस्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लेणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरु केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला साखर कारखाना स्थापन केला (जून, १९५०), आणि ‘सहकार’ या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयीसुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.
ऐतिहासिक महत्त्वाचे
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाहीचे व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्त्य ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरीच्या किनार्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनार्यावरच झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवाशातील उत्खननानंतर काढला आहे.
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चॉंदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली. निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मुघलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून नगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी नगर जिल्ह्याची स्थापना केली.
१९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझाद यांनी ‘गुबार - ए - खातिर’ हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
प्रशासन
जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती पुढे दिली आहे.
राजकीय संरचना
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ - शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे. शिर्डी हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
विधानसभा मतदारसंघ - शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा.
जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र व हंगामानुसार पिकांचा तपशील पुढे दिलेला आहे.
उद्योग
अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, जामखेड व संगमनेर या ठिकाणी महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहे. कायनेटिक इंजिनिअरिंग (सुपा, पारनेर), लार्सन अँड टुर्बो (अहमदनगर), व्हिडिओकॉन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स अँड बेअरिंग्ज (अहमदनगर), पारस उद्योग (कृषी अवजारे), इंडियन सीमलेस, सी.जी.न्यू एज- कमिन्स इंडिया असे प्रमुख उद्योग नगर जिल्ह्यात आहेत. धूत ग्रूपच्या सिमेंट पिशव्या (बॅग्ज) पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. कायनेटिकचे फिरोदिया व व्हिडिओकॉनचे धूत हे उद्योजक मूळचे नगरचेच. दीपक आर्ट्स या वैशिष्ट्यपूर्ण उद्योगात सुमारे ५०० कलावंत-कर्मचारी असून, येथे बनलेल्या भेटवस्तू संपूर्ण भारतात पाठवल्या जातात. यांच्या गणेश मूर्तीही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ फक्त नगरमध्येच तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात बस्ता बांधण्यासाठी (कापड खरेदीसाठी) राज्याच्या अनेक भागांतील लोक अहमदनगरमध्ये येतात.
सहकार : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सुमारे ४३५ शाखा असलेली बँक राज्यातील सर्वांत मोठी बँक मानली जाते. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी १९२३ मध्ये लोणी येथे ‘लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी’ स्थापून केली ही केवळ राज्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली सहकारी पतपेढी मानली जाते.
दळणवळण
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्गही पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी. चा रेल्वे (ब्रोडगेज) मार्ग जिल्ह्यात असून नगर-बीड-परळी आणि पुणतांबे-शिर्डी रेल्वे मार्गाचे काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विटा घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट - हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
अहमदनगरचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर
पर्यटन
अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे- श्री सिद्धिविनायकाचे- स्थान कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आहे. येथील उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्याचबरोबर खुद्द नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शेवगाव तालुक्यात आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती प्रसिद्ध आहे. झोपलेल्या अवस्थेतील गणपतीची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहेच, शिवाय काही मुस्लीमही या गणपतीचे भक्त आहेत हे विशेष.
शनि-शिंगणापूर हे स्थान नेवासे तालुक्यात असून, भारतात याची कीर्ती वाढत आहे. येथे श्री शनिदेवाचे मंदिर नसून, उघड्या चौथर्यावर (शनिदेवरूपी) शिळा आहे. या गावातील घरांना दरवाजे नाहीत, तसेच घरातील कपाटांना कुलुपे नाहीत, येथे चोरी होत नाही. शनि-अमावास्येला येथे भाविक प्रचंड संख्येने शनी दर्शनासाठी येतात. श्री क्षेत्र नेवासा येथे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे.ज्ञानेश्वरी सांगताना ज्या खांबास टेकून संत ज्ञानेश्वर बसत त्या खांबाला ‘पैस’ असे म्हणतात.
राहता तालुक्यातील शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व जाती-धर्मांचे भक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्री साईबाबा शिर्डी येथे प्रकट झाल्याचे मानले जाते. द्वारकामाई, गुरूस्थान, श्री साईबाबांनी प्रज्वलित केलेली धुनी, ते बसत असत ती शिळा अशा साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. शिर्डी येथे रोज हजारो लोक श्री साईनाथांचे दर्शन घेतात. धार्मिक महत्त्वामुळे आज या क्षेत्रात गर्दी वाढते आहे व त्यामुळे आनुषंगिक उद्योगही वाढत आहेत. रेल्वेची सोय, विमानतळ यांचाही विकास येथे होत असून शिर्डी हे विकास केंद्र बनत आहे.
राहता तालुक्यात शिर्डीपासून ७ कि. मी. अंतरावर साकुरी येथे कन्याकुमारी आश्रम आहे. श्री साईबाबांचे शिष्य श्री उपासनी महाराज यांनी या आश्रमाची स्थापना केली. येथे वेदाध्ययनाचे प्रशिक्षण घेतलेल्या ब्रह्मचारिणी महिला यज्ञ-याग-पूजा करतात. श्री उपासनी महाराज व सती गोदावरी माताजी यांची समाधी, एकमुखी दत्त मंदिर व शेवग्याच्या झाडावरील स्वयंभू गणपती ही साकुरीतील स्थाने भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.
नाथ संप्रदायाशी संबंधित अनेक पवित्र ठिकाणे नगर जिल्ह्यात आहेत. नाथ पंथाचे आदिपीठ वृद्धेश्वर (पाथर्डी तालुका), कानिफनाथांची समाधी असलेले मढी, नगरजवळ डोंगरगण येथील गोरक्षनाथांची समाधी ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. मढीमध्ये यात्रेच्या काळात गाढवांचा बाजार भरतो. पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी झाला. येथे अहिल्याबाईंनीच बांधलेले शिवमंदिर असून, त्यांचे स्मारकही विकसित करण्यात आले आहे. हिंदू धर्मातील शास्त्र-पुराणांचा गाढा अभ्यास असलेले शेख महंमद महाराज हे आध्यात्मिक क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीगोंदा येथे होऊन गेले. शेख महंमद यांची समाधी श्रीगोंदा येथे असून, ते हिंदू व मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे.
अकोले तालुक्यात रतनगड हा पुरातन किल्ला असून याच्या पायथ्याशी ११ व्या शतकात बांधलेले अमृतेश्र्वराचे मंदिर आहे. प्रवरा नदीचा उगम याच भागात आहे. खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांनी जिंकलेल्या शेवटच्या लढाईचा परिसर म्हणून महत्त्वपूर्ण आहे. १७७५ मध्ये मराठ्यांनी येथे निजामावर विजय मिळवला. अकोले तालुक्यातील हरिश्र्चंद्र गडावर हरिश्र्चंद्राचे हेमाडपंती मंदिर आहे. या गडावर मुळा नदीचा उगम असून, याच गडावर चांगदेवांनी तत्त्वसार हा ग्रंथ लिहिला. संगमनेर तालुक्यात पेमगिरी नावाचा वैशिष्ट्यपूर्ण गड आहे या किल्ल्यावर शहाजीराजांनी मूर्तझा निजामशहाला राज्याभिषेक केला होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गडावर सुमारे चार एकर जागा व्यापून टाकणारा प्रचंड, प्राचीन वटवृक्ष आहे. खुद्द नगर शहरातील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. येथे स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय नेत्यांना बंदिवासात ठेवण्यात आले होते, तो कक्ष जतन करण्यात आला आहे.
नगर शहरात कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांची समाधी व पूर्णाकृती पुतळा आहे. शहरातील चांदबीबीचा महालही प्रसिद्ध आहे. अवतार मेहेरबाबा यांची समाधी नगरजवळ अरणगाव (मेहेराबाद) येथे आहे. श्रीमेहेरबाबांनी १९२५ पासून, समाधी घेईपर्यंत (१९६९) मौनावस्था स्वीकारली होती. या ठिकाणी परदेशांतील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. जैन मुनी राष्ट्रसंत आनंदऋषी यांचे वास्तव्य नगरमध्ये होते. त्यांचा जन्मही याच जिल्ह्यातला, पाथर्डी तालुक्यातला. आनंदधाम या नावाने त्यांचे स्मारक आज नगरमध्ये उभे आहे. निसर्गरम्य परिसरामुळे अकोला तालुक्यातील डोंगर रांगांमुळे व प्रवरा नदीवरील धरणामुळे भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. येथे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ' रंधा धबधबा ' निर्माण झाला आहे, तसेच या परिसरातील अंबरेला फॉलही प्रसिद्ध आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात दाट जंगल आहे. या भागात कळसूबाई शिखराच्या व हरिश्र्चंद्रगडाच्या परिसरात वन्यजीव अभयारण्य आहे. येथे ठाकर व महादेव कोळी जमातीचे आदिवासी राहतात. कर्जत तालुक्यात देऊळगाव - रेहेकुरी येथेही अभयारण्य घोषित करण्यात आले असून ते काळविटांसाठी राखीव आहे. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज-माळढोक अभयारण्याचा काही भाग नगर जिल्ह्यातही येतो. माळढोक अभयारण्य नगरमधील कर्जत, श्रीगोंदे व नेवासा या तालुक्यात पसरलेले आहे. जायकवाडी (औरंगाबाद जिल्हा) धरणाचा जलाशयाचा काही भाग नगर जिल्ह्यात असून, येथेही पक्षी अभयारण्य आहे.
सामाजिक/विविध
अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते. नगर तालुक्यात शेंडी व पोखर्डी या गावांच्या सीमारेषेवर एक ओढा असून, त्या ओढ्याच्या पात्रात पोळ्याच्या दुसर्या दिवशी गौराईची लढाई खेळण्याची प्रथा आहे. या लढाईत दोन्ही गावांतील सुवासिनी मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. नगरमधील जिल्हा वाचनालय (ग‘ंथालय) १८२७ मध्ये स्थापन करण्यात आले. हे देशातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांपैकी एक असून, आजही वाचकांसाठी कार्यरत आहे
शैक्षणिक - अहमदनगर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रात येतो. जिल्ह्यात विविध प्रकारची सुमारे ६० महाविद्यालये आहेत. मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, हिंद सेवा मंडळ (स्वातंत्र्यसैनिकांची संस्था), भास्कर पां. हिवाळे शिक्षण संस्था (बी.पी.एच.ई.) आदी शिक्षण संस्था जिल्ह्यात व नगर शहरात कार्यरत आहेत. येथे रयत शिक्षण संस्थेचे मुलींचे महाविद्यालयही आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरानगर (लोणी) येथे सहकारी चळवळीच्या माध्यमातून विकसित झालेले शैक्षणिक केंद्र पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील शिक्षण संस्थेत व्यवस्थापन, वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी सर्व प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी पूर्ण देशातून विद्यार्थी येतात.
समाजसेवकांचा अहमदनगर जिल्हा - अलीकडच्या काळात नगर जिल्हा प्रभावी समाजसेवकांचा जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे इथलेच असून, त्यांनी पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी ह्या गावाचा अक्षरश: कायापालट केला आहे. आदर्श गाव ही संकल्पना त्यांनी शिस्तबद्धपणे राबवली व भारतात एका विकसित, संपन्न खेड्याचे आदर्श उदाहरण घालून दिले. पाणलोट क्षेत्रांचा विकास, सामाजिक वनीकरण, सेंद्रीय शेतीचा प्रयत्न, गांडूळ खत प्रकल्प, शिक्षण विकास, व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, गावातील लोकशाही, कुटुंबकल्याण या सर्वच क्षेत्रांमध्ये राळेगणची प्रगती झाल्याचे दिसून येते. अण्णा हजारे यांनी नापासांची शाळाही येथे काढली असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील मुलेही या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. भ्रष्टाचार निर्मूलन व माहितीचा अधिकार या क्षेत्रांत अण्णा हजारे यांनी मोठे कार्य केले असून शासनावर अंकुश निर्माण केला आहे.
नगर तालुक्यातील हिवरे बाजार या गावानेही राळेगण सिद्धीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती साधली आहे. पाणलोट क्षेत्र विकास, पाण्याची बचत व संयमित वापर ही येथील विकासाची प्रमुख सूत्रे आहेत. गेली अनेक वर्षे येथे ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक होत नाही. लोक एकत्र येऊन, एकमताने सरपंचाची निवड करतात. विंधन विहीर (बोअर वेल) न खोदणे, मुलींची लग्ने ठरवताना संबंधित मुलांची एच. आय.व्ही. टेस्ट घेणे असे क्रांतिकारक निर्णय गावाने घेतलेले आहेत. हिवरे बाजारचे शिल्पकार म्हणून पोपटराव पवार यांचा उल्लेख केला जातो.
नगर येथे शरीरविक्रय करणार्या स्त्रियांचे आरोग्य, त्यांचे पुनर्वसन, त्यांना कायदेशीर सहकार्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण व पुनर्वसन, एच.आय.व्ही. बाधितांचे आरोग्य, झोपडपट्टीतील मुलांचे शिक्षण, अनैतिक मानवी वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये स्नेहालय नावाची संस्था गेली २५ वर्षे कार्यरत आहे. वेश्यांच्या सुमारे २०० मुला-मुलींचे पुनर्वसन केंद्र स्नेहालयने उभारले असून, आत्तापर्यंत अनेक मुलींचे विवाह या संस्थेने लावून दिले आहेत. १९७० पासून जामखेड तालुक्यात डॉ. रजनीकांत व मेबल आरोळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यांना मॅगसेसे पुरस्कारही मिळाला आहे. राळेगण, हिवरेबाजार, स्नेहालय आदी ठिकाणे ही आधुनिक काळातील पर्यटन स्थळेच आहेत.
लष्कर - अहमदनगर हे लष्करीदृष्ट्या भारतातील महत्त्वाचे ठाणे आहे. नगरजवळ भिंगार येथे कॅन्टॉन्मेंट बोर्ड (लष्करी छावणी) आहे. ब्रिगेडीअर पातळीवरील अधिकारी बोर्डाचा प्रमुख म्हणून कार्यरत असतो. येथे लष्करातील पुढील संस्था आपले कर्तव्य बजावीत आहेत.
आर्मर्ड कोअर सेंटर अँण्ड स्कूल : लष्कराची नगरमधील ही सर्वात जुनी (१९४८) संस्था आहे. येथे रणगाडाविषयक प्रशिक्षण दिले जाते. जनरल अरुणकुमार वैद्य व जनरल के. सुंदरजी हे काही काळ या संस्थेचे प्रमुख होते. परमवीरचक‘ मिळविणारे कर्नल तारापोर व कर्नल खेत्रपाल यांनी याच संस्थेत प्रशिक्षण घेतले होते. या संस्थेने उभारलेले रणगाडा संग्रहालय केवळ नगरचेच नव्हे तर देशाचे भूषण आहे. आशिया खंडातील हे अशा प्रकारचे एकमेव संग्रहालय असून येथे इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रांन्स इ. देशांनी विविध युद्धांत वापरलेले सुमारे ४० रणगाडे ठेवण्यात आले आहेत. सर्वात जुना १९१७ चा रोल्स राईस रणगाडाही येथे पाहण्यास मिळतो.
मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर (एम. आय. आर. सी.) : ही पायदळातील जवानांना व अधिकार्यांना प्रशिक्षण देणारी संस्था १९७९ मध्ये नगर-सोलापूर रस्त्यावर सुरू करण्यात आली. जनरल के. सुंदरजी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची उभारणी झाली आहे. गेल्या काही वर्षात या संस्थेने मोठ्या प्रमाणावर वनीकरणाची मोहीम हाती घेतली असून एम.आर. आय. सी. ग्रीन ची निर्मिती केली आहे. व्हेईकल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्ही. आर. डी. इ) : येथे लष्कराच्या वाहनांविषयी संशोधन केले जाते. वाहनांचा दर्जा, क्षमता व सुरक्षिततेच्या विविध चाचण्या येथे केल्या जातात. पृथ्वी क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहन याच संस्थेत तयार करण्यात आले . पंजाब पोलिसांसाठी अतिरेक्यांविरुद्ध लढण्याकरिता तयार करण्यात आलेली बुलेटप्रुफ वाहने याच संस्थेत निर्माण करण्यात आली होती. या संस्थेच्या आवारातच राष्ट्रीय चाचणी केंद्र असून देशातील विविध प्रकारच्या वाहनांची चाचणी येथील मार्गांवर (ट्रॅक्सवर) घेतली जाते.
विशेष व्यक्ती
थोर स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब पटवर्धन व अच्युतराव पटवर्धन यांनी स्वातंत्र्यसंग्रामात नगरचे नेतृत्व केले. यांनीच नगरमध्ये विविध प्रकारच्या संस्था स्थापन करून जिल्ह्यात संस्थात्मक पाया मजबूत केला. रावसाहेब पटवर्धन यांनी अहमदनगर वाचनालय, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी या संस्थांची स्थापना केली. ते साधना साप्ताहिकाचे काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी आंतरभारती संस्था व सर्वोदय संघाचे अध्यक्षपद भूषवून त्या माध्यमातूनही संपूर्ण महाराष्ट्रात कार्य केले. बाळासाहेब भारदे रावसाहेबांचे अनुयायी होते. रावसाहेब व अच्युतराव यांनी जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते व नेते घडवले, त्यातूनच पुढे जिल्ह्याचा विकास साधला गेला.
स्वातंत्र्य संग्रामात विविध आंदोलनांत, विधायक कार्यांत कम्युनिस्ट नेते भाई सथ्था व सेनापती दादा चौधरी यांचाही प्रमुख सहभाग होता. सेनापती (पांडुरंग महादेव) बापट यांचा जन्म नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात झाला, तसेच ज्येष्ठ समाजवादी नेते व श्रेष्ठ संसदपटू कै. मधू दंडवते हेही मूळचे नगरचेच. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, रजनीकांत व मेबल आरोळे व पोपटराव पवार हे आपल्या कार्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधत आहेत.
एकेकाळी आपल्या कवितांनी महाराष्ट्राला वेड लावणारे कवी नारायण वामन (रेव्हरंड) टिळक व त्यांच्या पत्नी ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांचे वास्तव्य नगरमध्येच होते. रेव्हरंड टिळक यांचेकडे बालकवी ठोंबरे यांचेही वास्तव्य काही काळ होते.. कवी दत्त, वि.द. घाटे, रवीकिरण मंडळातील मनोरमा रानडे अशा अनेक कवींनी नगरचा लौकिक वाढवला. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. गंगाधर मोरजे, बंगाली साहित्याचा सरस अनुवाद करणारे विलास गीते, उर्दू साहित्याचे अभ्यासक प्रा. खलील मुजफ्फर, मराठी- सिंधी शब्दकोशाचे निर्माते प्रा. लछमन हर्दवाणी, विज्ञानकथा लेखक डॉ. अरुण मांडे हे सर्व साहित्यिक साहित्यसेवा करत नगरला व महाराष्ट्राला मोठे करत आहेत. संत ज्ञानेश्र्वर व श्रीकृष्णाची भूमिका अजरामर करणारे शाहू मोडक या चित्रपट अभिनेत्यांचे,व राम नगरकर, प्रा. मधुकर तोरडमल या नाट्य कलावंतांचे वास्तव्य काही काळ नगरमध्ये होते, तसेच ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत त्यांच्या लहानपणी नगरमध्ये राहिल्या होत्या. ‘यातनाम अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे मूळचे नगरचेच.
र. बा. केळकर, द.गो. कांबळे असे चित्रकार नगरमध्ये होऊन गेले. अंबादास मुदिगंटी, प्रकाश -प्रमोद कांबळे बंधू, अनुराधा ठाकूर इत्यादी चित्रकार-शिल्पकार आपल्या कलेच्या माध्यमातून नगरमध्ये कार्यरत आहेत. प्रमोद कांबळे या शिल्पकाराने बनवलेले वन्यप्राणी पाहण्यासाठी तसेच त्यांची कार्यशाळा व स्टुडिओ पाहण्यासाठी पूर्ण भारतातून लोक येतात.

जिल्ह्याचा लोकसंख्याविषयक तपशील पुढे दिलेला आहे
क्र. | तपशील | संख्या |
१ | क्षेत्रफळ | १७,०४८ चौ. कि. मी. |
२ | लोकसंख्या | ४०,४०,६४२ |
३ | पुरुष स्त्रिया |
२०,८३,०५३ १९,५७,५८९ |
४ | ग्रामीण शहरी |
३२,३६,९४५ ८,०३,६९७ |
५ | स्त्री-पुरुष गुणोत्तर | १००० : ९४० |
६ | एकूण साक्षरता पुरुष स्त्रि |
७५.३०% ८५.७०% ६४.३५% |
प्रशासन
तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ: (संदर्भ: जनगणना २००१)या जिल्ह्यात १४ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे
क्र. | तालुका | क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) | लोकसंख्या |
१ | अकोले | १,५७२.० | २,६६,६३८ |
२ | संगमनेर | १,६६५.३ | ४,४१,४३९ |
३ | कोपरगाव | ७६६.६ | २,७७,१७० |
४ | राहता | ६९६.३ | २,८८,२७९ |
५ | श्रीरामपूर | ५७४.६ | २,५६,४५८ |
६ | नेवासा | १,२९०.० | ३,२६,६९८ |
७ | शेवगांव |
१,०९२.० | २,०३,६७६ |
८ | पाथर्डी | १,३२८.६ | २,१४,८७२ |
९ | नगर | १,६४०.० | ६,०६,६९० |
१० | राहुरी | १,१०९.१ | २,९४,९२४ |
११ | पारनेर | १,८६८.० | २,४६,५५२ |
१२ | श्रीगोंदा | १,७१६.७ | २,७७,३५६ |
१३ | कर्जत | १,५०७.० | २,०५,६७४ |
१४ | जामखेड | ९१४.५ | १,३४,२१६ |
जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती पुढे दिली आहे.
क्र. | तपशील | संख्या | नावे |
१ | महानगरपालिका | १ | अहमदनगर |
२ | नगरपालिका | ९ | संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहता-पिंपळस, शिर्डी,(नगर पंचायत) कोपरगांव, देवळाली- प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदा. |
३ | जिल्हा परिषद | १ | अहमदनगर |
४ | पंचायत समित्या | १४ | कर्जत, श्रीगोंदे, पाथर्डी, नेवासा, कोपरगांव, पारनेर, अकोले, जामखेड, अहमदनगर, शेवगांव, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, राहता. |
५ | ग्रामपंचायती | १३५८ | -------- |
राजकीय संरचना
अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ - शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे. शिर्डी हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.
विधानसभा मतदारसंघ - शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा.
जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
शेती
क्र. | तपशील | क्षेत्र (हेक्टर) |
१ | निव्वळ लागवडी -खालील क्षेत्र | १११५३०० |
२ | जिरायत क्षेत्र | ८१०००० |
३ | बागायत क्षेत्र | ३०५३०० |
जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र व हंगामानुसार पिकांचा तपशील पुढे दिलेला आहे.
क्र. | हंगाम | प्रमुख पिके |
१ | खरीप | बाजरी, भुईमूग व तूर |
२ | रब्बी | गहू, करडई व हरभरा |
३ | खरीप व रब्बी | ज्वारी व ऊस |
ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही
हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर
कारखान्यांची संख्या जास्त आहे. अलीकडच्या काळात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब
या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे.
जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही
शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.
कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत
महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील
पहिले (१९६८) कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषिविषयक विविध अभ्यासक्रम
शिकवले जातात, तसेच अनेक पिकांबाबतचे संशोधन केले जाते. स्थापनेनंतर राहुरी
विद्यापीठाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. या
विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील
शेतकर्यांमध्ये लोकप्रिय आहेत. साखर कारखाना संख्येचा विचार करता राज्यात
पहिल्या क्रमांकावर असणार्या नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सूची
पुढे दिली आहे.
क्र. | साखर कारखान्याचे नाव | तालुका |
१ | अगस्ती सहकारी साखर कारखाना | अकोले |
२ | संगमनेर सहकारी साखर कारखाना | संगमनेर |
३ | कोपरगाव सहकारी साखर कारखाना | कोपरगाव |
४ | संजीवनी सहकारी साखर कारखाना | कोपरगाव |
५ | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना | प्रवरानगर,श्रीरामपूर |
६ | अशोक सहकारी साखर कारखाना | श्रीरामपूर |
७ | बेलापूर शुगर सहकारी साखर कारखाना | श्रीरामपूर |
८ | ज्ञानेश्र्वर सहकारी साखर कारखाना | नेवासे |
९ | मुळा सहकारी साखर कारखाना | नेवासे |
१० | केदारेश्र्वर सहकारी साखर कारखाना | शेवगाव |
११ | वृद्धेश्र्वर सहकारी साखर कारखाना | पाथर्डी |
१२ | नगर सहकारी साखर कारखाना | नगर |
१३ | तनपुरे सहकारी साखर कारखाना | राहुरी |
१४ | पारनेर तालुका सहकारी साखर कारखाना | पारनेर |
१५ | श्रीगोंदे सहकारी साखर कारखाना | श्रीगोंदे |
१६ | कुकडी सहकारी साखर कारखाना | श्रीगोंदे |
१७ | साईकृपा सहकारी साखर कारखाना | श्रीगोंदे |
१८ | जगदंबा सहकारी साखर कारखाना | कर्जत |
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना श्रीरामपूर तालुक्यात
लोणी (प्रवरानगर) येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी जून,१९५० मध्ये सुरू
केला.
उद्योग
अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, जामखेड व संगमनेर या ठिकाणी महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहे. कायनेटिक इंजिनिअरिंग (सुपा, पारनेर), लार्सन अँड टुर्बो (अहमदनगर), व्हिडिओकॉन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स अँड बेअरिंग्ज (अहमदनगर), पारस उद्योग (कृषी अवजारे), इंडियन सीमलेस, सी.जी.न्यू एज- कमिन्स इंडिया असे प्रमुख उद्योग नगर जिल्ह्यात आहेत. धूत ग्रूपच्या सिमेंट पिशव्या (बॅग्ज) पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. कायनेटिकचे फिरोदिया व व्हिडिओकॉनचे धूत हे उद्योजक मूळचे नगरचेच. दीपक आर्ट्स या वैशिष्ट्यपूर्ण उद्योगात सुमारे ५०० कलावंत-कर्मचारी असून, येथे बनलेल्या भेटवस्तू संपूर्ण भारतात पाठवल्या जातात. यांच्या गणेश मूर्तीही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.
संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ फक्त नगरमध्येच तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात बस्ता बांधण्यासाठी (कापड खरेदीसाठी) राज्याच्या अनेक भागांतील लोक अहमदनगरमध्ये येतात.
सहकार : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सुमारे ४३५ शाखा असलेली बँक राज्यातील सर्वांत मोठी बँक मानली जाते. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी १९२३ मध्ये लोणी येथे ‘लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी’ स्थापून केली ही केवळ राज्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली सहकारी पतपेढी मानली जाते.
दळणवळण
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्गही पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी. चा रेल्वे (ब्रोडगेज) मार्ग जिल्ह्यात असून नगर-बीड-परळी आणि पुणतांबे-शिर्डी रेल्वे मार्गाचे काम आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विटा घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट - हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
अहमदनगरचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर
...पासून | अंतर(कि.मी.) |
मुंबई | २५७ |
नागपूर | ६०६ |
औरंगाबाद | ११८ |
रत्नागिरी | ४४३ |
पुणे | १२० |
संद़र्भ- महाराष्ट्र मार्गदर्शक नकाशा
समर्थ उद्योग, औरंगाबाद.
समर्थ उद्योग, औरंगाबाद.
अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे- श्री सिद्धिविनायकाचे- स्थान कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आहे. येथील उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्याचबरोबर खुद्द नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शेवगाव तालुक्यात आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती प्रसिद्ध आहे. झोपलेल्या अवस्थेतील गणपतीची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहेच, शिवाय काही मुस्लीमही या गणपतीचे भक्त आहेत हे विशेष.
शनि-शिंगणापूर हे स्थान नेवासे तालुक्यात असून, भारतात याची कीर्ती वाढत आहे. येथे श्री शनिदेवाचे मंदिर नसून, उघड्या चौथर्यावर (शनिदेवरूपी) शिळा आहे. या गावातील घरांना दरवाजे नाहीत, तसेच घरातील कपाटांना कुलुपे नाहीत, येथे चोरी होत नाही. शनि-अमावास्येला येथे भाविक प्रचंड संख्येने शनी दर्शनासाठी येतात. श्री क्षेत्र नेवासा येथे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे.ज्ञानेश्वरी सांगताना ज्या खांबास टेकून संत ज्ञानेश्वर बसत त्या खांबाला ‘पैस’ असे म्हणतात.
राहता तालुक्यातील शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व जाती-धर्मांचे भक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्री साईबाबा शिर्डी येथे प्रकट झाल्याचे मानले जाते. द्वारकामाई, गुरूस्थान, श्री साईबाबांनी प्रज्वलित केलेली धुनी, ते बसत असत ती शिळा अशा साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. शिर्डी येथे रोज हजारो लोक श्री साईनाथांचे दर्शन घेतात. धार्मिक महत्त्वामुळे आज या क्षेत्रात गर्दी वाढते आहे व त्यामुळे आनुषंगिक उद्योगही वाढत आहेत. रेल्वेची सोय, विमानतळ यांचाही विकास येथे होत असून शिर्डी हे विकास केंद्र बनत आहे.
राहता तालुक्यात शिर्डीपासून ७ कि. मी. अंतरावर साकुरी येथे कन्याकुमारी आश्रम आहे. श्री साईबाबांचे शिष्य श्री उपासनी महाराज यांनी या आश्रमाची स्थापना केली. येथे वेदाध्ययनाचे प्रशिक्षण घेतलेल्या ब्रह्मचारिणी महिला यज्ञ-याग-पूजा करतात. श्री उपासनी महाराज व सती गोदावरी माताजी यांची समाधी, एकमुखी दत्त मंदिर व शेवग्याच्या झाडावरील स्वयंभू गणपती ही साकुरीतील स्थाने भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.
नाथ संप्रदायाशी संबंधित अनेक पवित्र ठिकाणे नगर जिल्ह्यात आहेत. नाथ पंथाचे आदिपीठ वृद्धेश्वर (पाथर्डी तालुका), कानिफनाथांची समाधी असलेले मढी, नगरजवळ डोंगरगण येथील गोरक्षनाथांची समाधी ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. मढीमध्ये यात्रेच्या काळात गाढवांचा बाजार भरतो. पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी झाला. येथे अहिल्याबाईंनीच बांधलेले शिवमंदिर असून, त्यांचे स्मारकही विकसित करण्यात आले आहे. हिंदू धर्मातील शास्त्र-पुराणांचा गाढा अभ्यास असलेले शेख महंमद महाराज हे आध्यात्मिक क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीगोंदा येथे होऊन गेले. शेख महंमद यांची समाधी श्रीगोंदा येथे असून, ते हिंदू व मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे.
अकोले तालुक्यात रतनगड हा पुरातन किल्ला असून याच्या पायथ्याशी ११ व्या शतकात बांधलेले अमृतेश्र्वराचे मंदिर आहे. प्रवरा नदीचा उगम याच भागात आहे. खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांनी जिंकलेल्या शेवटच्या लढाईचा परिसर म्हणून महत्त्वपूर्ण आहे. १७७५ मध्ये मराठ्यांनी येथे निजामावर विजय मिळवला. अकोले तालुक्यातील हरिश्र्चंद्र गडावर हरिश्र्चंद्राचे हेमाडपंती मंदिर आहे. या गडावर मुळा नदीचा उगम असून, याच गडावर चांगदेवांनी तत्त्वसार हा ग्रंथ लिहिला. संगमनेर तालुक्यात पेमगिरी नावाचा वैशिष्ट्यपूर्ण गड आहे या किल्ल्यावर शहाजीराजांनी मूर्तझा निजामशहाला राज्याभिषेक केला होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गडावर सुमारे चार एकर जागा व्यापून टाकणारा प्रचंड, प्राचीन वटवृक्ष आहे. खुद्द नगर शहरातील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. येथे स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय नेत्यांना बंदिवासात ठेवण्यात आले होते, तो कक्ष जतन करण्यात आला आहे.
नगर शहरात कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांची समाधी व पूर्णाकृती पुतळा आहे. शहरातील चांदबीबीचा महालही प्रसिद्ध आहे. अवतार मेहेरबाबा यांची समाधी नगरजवळ अरणगाव (मेहेराबाद) येथे आहे. श्रीमेहेरबाबांनी १९२५ पासून, समाधी घेईपर्यंत (१९६९) मौनावस्था स्वीकारली होती. या ठिकाणी परदेशांतील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. जैन मुनी राष्ट्रसंत आनंदऋषी यांचे वास्तव्य नगरमध्ये होते. त्यांचा जन्मही याच जिल्ह्यातला, पाथर्डी तालुक्यातला. आनंदधाम या नावाने त्यांचे स्मारक आज नगरमध्ये उभे आहे. निसर्गरम्य परिसरामुळे अकोला तालुक्यातील डोंगर रांगांमुळे व प्रवरा नदीवरील धरणामुळे भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. येथे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ' रंधा धबधबा ' निर्माण झाला आहे, तसेच या परिसरातील अंबरेला फॉलही प्रसिद्ध आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात दाट जंगल आहे. या भागात कळसूबाई शिखराच्या व हरिश्र्चंद्रगडाच्या परिसरात वन्यजीव अभयारण्य आहे. येथे ठाकर व महादेव कोळी जमातीचे आदिवासी राहतात. कर्जत तालुक्यात देऊळगाव - रेहेकुरी येथेही अभयारण्य घोषित करण्यात आले असून ते काळविटांसाठी राखीव आहे. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज-माळढोक अभयारण्याचा काही भाग नगर जिल्ह्यातही येतो. माळढोक अभयारण्य नगरमधील कर्जत, श्रीगोंदे व नेवासा या तालुक्यात पसरलेले आहे. जायकवाडी (औरंगाबाद जिल्हा) धरणाचा जलाशयाचा काही भाग नगर जिल्ह्यात असून, येथेही पक्षी अभयारण्य आहे.
अहमदनगर जिल्ह्यात असंख्य वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत.
त्यांपैकी महत्त्वाच्या ठिकाणांची सूची पुढीलप्रमाणे

क्र. | ठिकाण | तपशील |
१ | दुर्योधन मंदिर, दुर्गाव (ता. कर्जत) | महाराष्ट्रातील एकमेव दुर्योधन मंदिर. जवळ अश्र्वत्थाम्याचे दुर्मीळ मंदिरही आहे. |
२ | कोल्हारचे भगवतीमाता मंदिर |
१३ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिरात देवींची साडेतीन शक्तिपीठे एकवटल्याचे मानले जाते. |
३ | अगस्ती आश्रम, अकोले | येथे अगस्ती ऋषींनी रामायण काळात कृषिविद्या शिकवल्याचे मानले जाते. |
४ | काशीकेदार (पाथर्डी-शेवगावच्या सीमेवर) |
येथे भारतातील रसायन शास्त्राचा प्रवर्तक सिद्धनागार्जून याची समाधी असून काशीकेदारजवळील सोनकडा दरीत हे स्थान आहे. |
५ | धामोरी (ता. कोपरगाव) |
येथे अडबंगीनाथांच्या तपोभूमीजवळ ७५० वर्षांपूर्वीचा गोरखचिंचेचा विराट वृक्ष आहे. या वृक्षाच्या नऊ मोठ्या फांद्या म्हणजे नऊ-नाथ असे मानले जाते. |
६ | वडगावदर्याचे लवणस्तंभ (ता. पारनेर) |
वडगावदर्या येथे खडकाच्या खोबणीत वरून लोंबकळणारे दगडी स्तंभ आहेत. असे ‘लवण स्तंभ’ जगात फार थोड्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. |
७ | निघोज, ता. पारनेर. | कुकडी नदीच्या पात्रात येथे प्रवाहामुळे खडक घासले जाऊन नैसर्गिक दगडी खळगे / रांजण खळगे (पॉट होल्स) निर्माण झाले आहेत. आशियातील ही सर्वांत मोठी निसर्गनिर्मित पॉट होल्स आहेत. |
अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते. नगर तालुक्यात शेंडी व पोखर्डी या गावांच्या सीमारेषेवर एक ओढा असून, त्या ओढ्याच्या पात्रात पोळ्याच्या दुसर्या दिवशी गौराईची लढाई खेळण्याची प्रथा आहे. या लढाईत दोन्ही गावांतील सुवासिनी मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. नगरमधील जिल्हा वाचनालय (ग‘ंथालय) १८२७ मध्ये स्थापन करण्यात आले. हे देशातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांपैकी एक असून, आजही वाचकांसाठी कार्यरत आहे
शैक्षणिक - अहमदनगर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रात येतो. जिल्ह्यात विविध प्रकारची सुमारे ६० महाविद्यालये आहेत. मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, हिंद सेवा मंडळ (स्वातंत्र्यसैनिकांची संस्था), भास्कर पां. हिवाळे शिक्षण संस्था (बी.पी.एच.ई.) आदी शिक्षण संस्था जिल्ह्यात व नगर शहरात कार्यरत आहेत. येथे रयत शिक्षण संस्थेचे मुलींचे महाविद्यालयही आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरानगर (लोणी) येथे सहकारी चळवळीच्या माध्यमातून विकसित झालेले शैक्षणिक केंद्र पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील शिक्षण संस्थेत व्यवस्थापन, वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी सर्व प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी पूर्ण देशातून विद्यार्थी येतात.
समाजसेवकांचा अहमदनगर जिल्हा - अलीकडच्या काळात नगर जिल्हा प्रभावी समाजसेवकांचा जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे इथलेच असून, त्यांनी पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी ह्या गावाचा अक्षरश: कायापालट केला आहे. आदर्श गाव ही संकल्पना त्यांनी शिस्तबद्धपणे राबवली व भारतात एका विकसित, संपन्न खेड्याचे आदर्श उदाहरण घालून दिले. पाणलोट क्षेत्रांचा विकास, सामाजिक वनीकरण, सेंद्रीय शेतीचा प्रयत्न, गांडूळ खत प्रकल्प, शिक्षण विकास, व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, गावातील लोकशाही, कुटुंबकल्याण या सर्वच क्षेत्रांमध्ये राळेगणची प्रगती झाल्याचे दिसून येते. अण्णा हजारे यांनी नापासांची शाळाही येथे काढली असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील मुलेही या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. भ्रष्टाचार निर्मूलन व माहितीचा अधिकार या क्षेत्रांत अण्णा हजारे यांनी मोठे कार्य केले असून शासनावर अंकुश निर्माण केला आहे.
नगर तालुक्यातील हिवरे बाजार या गावानेही राळेगण सिद्धीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती साधली आहे. पाणलोट क्षेत्र विकास, पाण्याची बचत व संयमित वापर ही येथील विकासाची प्रमुख सूत्रे आहेत. गेली अनेक वर्षे येथे ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक होत नाही. लोक एकत्र येऊन, एकमताने सरपंचाची निवड करतात. विंधन विहीर (बोअर वेल) न खोदणे, मुलींची लग्ने ठरवताना संबंधित मुलांची एच. आय.व्ही. टेस्ट घेणे असे क्रांतिकारक निर्णय गावाने घेतलेले आहेत. हिवरे बाजारचे शिल्पकार म्हणून पोपटराव पवार यांचा उल्लेख केला जातो.
नगर येथे शरीरविक्रय करणार्या स्त्रियांचे आरोग्य, त्यांचे पुनर्वसन, त्यांना कायदेशीर सहकार्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण व पुनर्वसन, एच.आय.व्ही. बाधितांचे आरोग्य, झोपडपट्टीतील मुलांचे शिक्षण, अनैतिक मानवी वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये स्नेहालय नावाची संस्था गेली २५ वर्षे कार्यरत आहे. वेश्यांच्या सुमारे २०० मुला-मुलींचे पुनर्वसन केंद्र स्नेहालयने उभारले असून, आत्तापर्यंत अनेक मुलींचे विवाह या संस्थेने लावून दिले आहेत. १९७० पासून जामखेड तालुक्यात डॉ. रजनीकांत व मेबल आरोळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यांना मॅगसेसे पुरस्कारही मिळाला आहे. राळेगण, हिवरेबाजार, स्नेहालय आदी ठिकाणे ही आधुनिक काळातील पर्यटन स्थळेच आहेत.
लष्कर - अहमदनगर हे लष्करीदृष्ट्या भारतातील महत्त्वाचे ठाणे आहे. नगरजवळ भिंगार येथे कॅन्टॉन्मेंट बोर्ड (लष्करी छावणी) आहे. ब्रिगेडीअर पातळीवरील अधिकारी बोर्डाचा प्रमुख म्हणून कार्यरत असतो. येथे लष्करातील पुढील संस्था आपले कर्तव्य बजावीत आहेत.
आर्मर्ड कोअर सेंटर अँण्ड स्कूल : लष्कराची नगरमधील ही सर्वात जुनी (१९४८) संस्था आहे. येथे रणगाडाविषयक प्रशिक्षण दिले जाते. जनरल अरुणकुमार वैद्य व जनरल के. सुंदरजी हे काही काळ या संस्थेचे प्रमुख होते. परमवीरचक‘ मिळविणारे कर्नल तारापोर व कर्नल खेत्रपाल यांनी याच संस्थेत प्रशिक्षण घेतले होते. या संस्थेने उभारलेले रणगाडा संग्रहालय केवळ नगरचेच नव्हे तर देशाचे भूषण आहे. आशिया खंडातील हे अशा प्रकारचे एकमेव संग्रहालय असून येथे इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रांन्स इ. देशांनी विविध युद्धांत वापरलेले सुमारे ४० रणगाडे ठेवण्यात आले आहेत. सर्वात जुना १९१७ चा रोल्स राईस रणगाडाही येथे पाहण्यास मिळतो.
मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर (एम. आय. आर. सी.) : ही पायदळातील जवानांना व अधिकार्यांना प्रशिक्षण देणारी संस्था १९७९ मध्ये नगर-सोलापूर रस्त्यावर सुरू करण्यात आली. जनरल के. सुंदरजी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची उभारणी झाली आहे. गेल्या काही वर्षात या संस्थेने मोठ्या प्रमाणावर वनीकरणाची मोहीम हाती घेतली असून एम.आर. आय. सी. ग्रीन ची निर्मिती केली आहे. व्हेईकल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्ही. आर. डी. इ) : येथे लष्कराच्या वाहनांविषयी संशोधन केले जाते. वाहनांचा दर्जा, क्षमता व सुरक्षिततेच्या विविध चाचण्या येथे केल्या जातात. पृथ्वी क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहन याच संस्थेत तयार करण्यात आले . पंजाब पोलिसांसाठी अतिरेक्यांविरुद्ध लढण्याकरिता तयार करण्यात आलेली बुलेटप्रुफ वाहने याच संस्थेत निर्माण करण्यात आली होती. या संस्थेच्या आवारातच राष्ट्रीय चाचणी केंद्र असून देशातील विविध प्रकारच्या वाहनांची चाचणी येथील मार्गांवर (ट्रॅक्सवर) घेतली जाते.
विशेष व्यक्ती
थोर स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब पटवर्धन व अच्युतराव पटवर्धन यांनी स्वातंत्र्यसंग्रामात नगरचे नेतृत्व केले. यांनीच नगरमध्ये विविध प्रकारच्या संस्था स्थापन करून जिल्ह्यात संस्थात्मक पाया मजबूत केला. रावसाहेब पटवर्धन यांनी अहमदनगर वाचनालय, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी या संस्थांची स्थापना केली. ते साधना साप्ताहिकाचे काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी आंतरभारती संस्था व सर्वोदय संघाचे अध्यक्षपद भूषवून त्या माध्यमातूनही संपूर्ण महाराष्ट्रात कार्य केले. बाळासाहेब भारदे रावसाहेबांचे अनुयायी होते. रावसाहेब व अच्युतराव यांनी जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते व नेते घडवले, त्यातूनच पुढे जिल्ह्याचा विकास साधला गेला.
स्वातंत्र्य संग्रामात विविध आंदोलनांत, विधायक कार्यांत कम्युनिस्ट नेते भाई सथ्था व सेनापती दादा चौधरी यांचाही प्रमुख सहभाग होता. सेनापती (पांडुरंग महादेव) बापट यांचा जन्म नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात झाला, तसेच ज्येष्ठ समाजवादी नेते व श्रेष्ठ संसदपटू कै. मधू दंडवते हेही मूळचे नगरचेच. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, रजनीकांत व मेबल आरोळे व पोपटराव पवार हे आपल्या कार्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधत आहेत.
एकेकाळी आपल्या कवितांनी महाराष्ट्राला वेड लावणारे कवी नारायण वामन (रेव्हरंड) टिळक व त्यांच्या पत्नी ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांचे वास्तव्य नगरमध्येच होते. रेव्हरंड टिळक यांचेकडे बालकवी ठोंबरे यांचेही वास्तव्य काही काळ होते.. कवी दत्त, वि.द. घाटे, रवीकिरण मंडळातील मनोरमा रानडे अशा अनेक कवींनी नगरचा लौकिक वाढवला. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. गंगाधर मोरजे, बंगाली साहित्याचा सरस अनुवाद करणारे विलास गीते, उर्दू साहित्याचे अभ्यासक प्रा. खलील मुजफ्फर, मराठी- सिंधी शब्दकोशाचे निर्माते प्रा. लछमन हर्दवाणी, विज्ञानकथा लेखक डॉ. अरुण मांडे हे सर्व साहित्यिक साहित्यसेवा करत नगरला व महाराष्ट्राला मोठे करत आहेत. संत ज्ञानेश्र्वर व श्रीकृष्णाची भूमिका अजरामर करणारे शाहू मोडक या चित्रपट अभिनेत्यांचे,व राम नगरकर, प्रा. मधुकर तोरडमल या नाट्य कलावंतांचे वास्तव्य काही काळ नगरमध्ये होते, तसेच ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत त्यांच्या लहानपणी नगरमध्ये राहिल्या होत्या. ‘यातनाम अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे मूळचे नगरचेच.
र. बा. केळकर, द.गो. कांबळे असे चित्रकार नगरमध्ये होऊन गेले. अंबादास मुदिगंटी, प्रकाश -प्रमोद कांबळे बंधू, अनुराधा ठाकूर इत्यादी चित्रकार-शिल्पकार आपल्या कलेच्या माध्यमातून नगरमध्ये कार्यरत आहेत. प्रमोद कांबळे या शिल्पकाराने बनवलेले वन्यप्राणी पाहण्यासाठी तसेच त्यांची कार्यशाळा व स्टुडिओ पाहण्यासाठी पूर्ण भारतातून लोक येतात.
No comments:
Post a Comment